Skip to main content
लॉक डाऊन मधलं माझं मार्केटिंग....

कोकणी माणूस आणि मासे म्हणजे अतूट नातं... वाराचे, बिनवाराचे कसेही मासे खाणारे लोक भरपूर. सध्याची त्यांची अवस्था म्हणजे वाघाला गवत खायला द्यावं अशी झालेली...
अशा काळात काल मला आमच्या एका जुन्या सहकाऱ्यांचा मेसेज आला चिंगळ मिळतील. आमच्या घरातही खाणारे आहेतच,अर्थात मी सोडून..चौकशीसाठी फोन केला म्हणाले घरी या न्यायला. म्हटलं घरी तर येऊ शकत नाही पण चिंगळ तर हवीत. माझ्यासाठी ते म्हणाले, तुम्हालाच हवीत ना मी घरी येऊन देतो...मग बोलताना तो माणूसही हाडाचा मार्केटिंगवाला, मॅडम बघा जरा 10 किलोची ऑर्डर द्या मग मी आणून देतो घरी...बर पडेल
.....झालं ...सुरवातीला झक मारली चिंगळ अस म्हणून मी फोन ठेवला खरा पण जित्याची खोड म्हणतात ना...हातात मोबाईल होताच ,पाच सहा फोन केले आणि सहज 8 किलोची ऑर्डर हातात पडली...
     गम्मत म्हणजे चिंगळ हवी का म्हणून चक्क सोनाली फोन करतेय याच शेजारी कौतुक...कारण मी माहेरची 'बापट' आणि लग्नाला 20 वर्ष होऊनही मी मासे खाण सोडाच पण कधी हातही लावलेला नाही...त्यामुळे चिंगळ हवी का म्हणून माझा फोन आणि देणारी कोण तर कुलकर्णी....सकाळी चिंगळ। घरी येइपर्यंत ऑर्डर येत होत्या...खर तर या सगळ्या खरेदी विक्रीत मला रुपयाचाही फायदा मी करून घेतला नाही की 4 चिंगळ आम्हाला जादा मागितली नाहीत..
पण माझं मार्केटिंगच स्किल अजूनही जबरदस्त आहे याचा पुन्हा अनुभव आला...सकाळ पेपरच्या मधुरांगणला काम करताना केवळ फोनवरून काही हजारांची स्पॉन्सर शिप मिळवायचे...आज तेच केलं...3 हजार रुपयांची चिंगळ विकली तीही माशाला हात न लावता...आणि रुपयाचाही फायदा करून न घेता...आपल्यामुळे दुसऱ्याचा फायदा  होतोय हे माहीत असूनही मी हे काम आनंदाने केलं...
आपल्या ओळखीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेता न येणं हा खर तर माझ्यासाठी मोठा तोटा आहे...पण हरकत नाही...सगळेच फायदे पैशात मोजून चालत नाहीत, कारण देव परीक्षा घेतो तेव्हा त्याचे कायदे वेगळे असतात...

© सोनाली सावंत...
रत्नागिरी

Comments